नवरात्रीनिमीत्त अप्सरेचा गरबा स्पेशल अंदाज

मुंबई तक

सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाचा माहोल आहे. या दिवसांमध्ये प्रत्येक जण ९ दिवस ९ विविध रंगाचे कपडे घालून मिरवण्याची हौस पूर्ण करत असतात.

सर्व फोटो सौजन्य - सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम अकाऊंट

यात मराठी सिनेसृष्टीच्या अभिनेत्री कशा बरं मागे राहतील? अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपला खास गरबा स्पेशल लूक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यातील तिच्या या खास फोटोंना सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली आहे.

सोनाली नेहमी तिच्या ग्लॅमरस लूकमधल्या फोटोशूटसाठी ओळखली जाते. तिचे चाहते या फोटोंना पसंतीही देतात

सोनालीच्या या गरबा स्पेशल लूकची सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मग तुम्हाला आवडला का सोनालीचा हा स्पेशल अंदाज? सोनालीचे आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा