तुझी भरुनिया ओटी...! महिषासुर मर्दिनी आई तुळजाभवानीचं रुप बघितलं का?

मुंबई तक

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुर्गाष्टमी दिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.

महिषासुर दैत्यानं सर्व देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला.

त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे.

जगदंबा आईने सर्व दैत्यांचा राजा महिषासुराचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला.

त्यामुळे देवीला शिवकालीन दागिने असलेला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.

आई भवानीला महिषासुर दैत्याचा वध करताना दाखविण्यात आले.

मंगळवारी (१२ ऑक्टोबर) आई भवानी मातेची तलवार अलंकार महापूजा करण्यात आली.

देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन दागिने व अलंकार घालण्यात आले. त्यात राजा शिवछत्रपती असे अक्षर कोरलेले सोन्याची 108 राजमुद्रा असलेली माळ भवानीला घालण्यात आली.

स्वराज्य स्थापनेसाठी व दुष्टांचा संहार करून प्रजेचं रक्षण करण्यासाठी तुळजाभवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली होती, अशी आख्यायिका आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचे दर्शन घेताना व तलवार घेतानाच देखावा मांडण्यात आलेला होता.