555 दात असलेला मासा पाहिला का?

मुंबई तक

हा जगातील सर्वाधिक दात असणारा मासा आहे. या माशाच्या तोंडात तब्बल 555 दात असतात. या माश्याचे दररोज 20 दात तुटतात. तर दररोज 20 नवे दात पुन्हा येतात.

(फोटो सौजन्य: Getty Images)

या माशाचे दोन जबडे असतात आणि यामध्येच हे दात असतात. जेव्हा एखादा जीव या माश्याच्या तोंडात सापडतो तेव्हा तो सुटणं जवळजवळ अशक्य असतं.

(फोटो सौजन्य: Getty Images)

सर्वाधिक दात असणारा या माशाचे नाव पॅसिफिक लिंगकॉड असं आहे. या माश्याच्या शरीरात दात येणं आणि तुटणं ही प्रोसेस वेगवान असते.

(फोटो सौजन्य: Getty Images)

हा मासा उत्तर प्रशांत महासागरात सापडतो. याची लांबी साधारण 20 इंच असते. तर काही मासे पाच फूटापर्यंत लांब असतात.

(फोटो सौजन्य: Getty Images)

या माशाच्या तोडांत प्रचंड टोकदार मायक्रोस्कोपिक दात असतात.

(फोटो सौजन्य: Getty Images)

हा मासा आपल्या दातांच्या जोरावरच आपली शिकार मिळवतो.

(फोटो सौजन्य: Getty Images)

हा मासा अत्यंत खतरनाक समजला जातो. कारण एवढे दात असणारा दुसरा मासा तरी अद्याप आढळलेला नाही.

(फोटो सौजन्य: Getty Images)

या माश्याचे दात एवढे छोटे आहेत की, त्यामुळेच त्यांची दात तुटण्याची प्रक्रिया वेगाने सुरु असते.

(फोटो सौजन्य: Getty Images)

दरम्यान, या माश्याच्या जबड्यात एवढे मासे येतात कसे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

(फोटो सौजन्य: Getty Images)