Ganesh Utsav 2021: पाहा पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा 5 कोटींचा सोन्याचा मुकुट!

पंकज खेळकर

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेश उत्सवानिमित्त एका भाविकाने तब्बल 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला.

पुण्यातील एका उद्योगपती भाविकाने हा सोनेरी मुकुट दिला असल्याचं समजतं आहे. संपूर्ण सोन्यात घडवलेल्या या मुकुटावर नक्षीदार कोरीव काम करण्यात आलं आहे.

आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर या उद्योगपती भक्ताने मुकुट दान केलं असल्याची माहिती समजते आहे.

या सोन्याच्या मुकुटाची सध्या बाजारभावानुसार किंमत साधारण पाच कोटींच्या आसपास आहे.

या मुकुटासाठी जे सोनं वापरण्यात आलं आहे त्याचीच मूळ किंमत ही 4 कोटी 80 लाख रुपये एवढी आहे.

सन 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला.

पुण्यातलं प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची ख्याती आहे.