राणांची नवी रणनिती, जामीनासाठी अर्जच करणार नाही!

मुंबई तक

अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांना आणि त्यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

उद्या म्हणजेच रविवारी त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 153 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

याशिवाय खार पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

कट करुन आमच्याविरोधात भाषणबाजी करण्यात आली, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

नवनीत आणि रवी राणा हे जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

ही अटक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय केल्याचे नवनीत यांच्या वकिलाने म्हटलं आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)

दुसरीकडे राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याच तक्रारीनंतर खार पोलिसांनी नवनीत राणा यांना पोलीस ठाण्यात नेऊन अटक केली आहे.

(फाइल फोटो, सौजन्य: पीटीआय)