कंडोम सेल्सगर्ल बनल्याने 'या' अभिनेत्रीला केलं जातंय भयंकर ट्रोल

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा मागील काही दिवसांपासून आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एक दमदार मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

याआधी ती 'छोरी' या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने समाजातील काही समस्यांवर आवाज उठवत एक खास संदेशही दिला होता.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

आता नुसरत ही 'जनहित में जारी' या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

या सिनेमात ती कंडोमबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत आहे. या सिनेमात नुसरत भरुचा ही एका सेल्सगर्लची भूमिका साकारत आहे.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

मात्र, कंडोम सेल्सगर्लची भूमिका करणाऱ्या नुसरतला आता अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल केलं जात आहे. तिला स्लट शेम केलं जात आहे.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

नुसरतने आपल्या या सिनेमाचे जे पोस्टर शेअर केले आहेत त्यावर अनेक यूजर्स हे अश्लील कमेंट्स करत आहेत. अनेक जण तर या सिनेमाला D ग्रेड असं संबोधत आहेत.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)

प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा - 2, सोनू के टिटू की स्वीटी यासारख्या सिनेमातून नुसरतने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

(फोटो सौजन्य: nushrratt bharuccha/instagram)