48MP कॅमेरा... Vivo चा नवा स्मार्टफोन लाँच

मुंबई तक

Vivo Y50t स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये स्क्रीनच्या टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये कॅमेऱ्यासाठी कटआऊट दिलं आहे.

Vivo Y50t मध्ये रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo Y50t 8GB + 128 GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,399 (जवळजवळ 16,300 रुपये) आहे.

या फोनची विक्री कंपनीच्या साइटवरुन सुरु करण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉईड 10 बेस्ड OriginOS 1.0 वर आधारित आहे.

यामध्ये 120GHz टच सॅम्पिलंग रेटसह 6.53 इंच फुल एचडी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 618 GPU आणि 8GB रॅमसह क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 720G प्रोसेसर आहे.

याची इंटरनल मेमरी 128GB एवढी आहे. जी 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोटोग्राफीसाठी यामध्ये रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा हा 48MP एवढा आहे.

यामध्ये 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 2MP मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच फ्रंटमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.