शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट करणारी केतकी चितळे आहे तरी कोण?

मुंबई तक

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट केल्याने ती चर्चेत आहे.. मात्र वाद आणि केतकी चितळे हे नातं नवं नाही.

सर्व फोटो सौजन्य-केतकी चितळे, इंस्टाग्राम अकाऊंट

केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे

केतकी चितळे ही छोट्या पडद्यावरची अभिनेत्री आहे, तुझं माझं ब्रेक अप या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही.

केतकी नंतर चर्चेत राहिली ती तिच्या सोशल मीडियांवरच्या वादग्रस्त पोस्टमुळेच. एपिलेप्सी या आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता.

केतकीने एका पोस्टमध्ये विविध धर्म आणि पंथांचा उल्लेख करत लिहिलं होतं नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू शब्द उच्चारला तर घोर पापी आणि कट्टरवादी? अशी पोस्ट तिने केली होती ज्यावरून वाद झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखही तिने एकेरी भाषेत केला होता त्यावरूनही तिच्यावर बरीच टीका झाली होती

शरद पवारांविषयी तिने आक्षेपार्ह कविता पोस्ट केली आहे, त्यावरून आता ती पुन्हा चर्चेत आहे.

त्यामुळे केतकी चितळे आणि वाद हे समीकरणच तयार झालं आहे. तिला आता पुन्हा एकदा ट्रोल केलं जातं आहे.