गुळाने केली शेतकऱ्याची दिवाळी गोड

कोल्हापुरात हंगामातील पहिल्या गुळाचा सौदा संपन्न, समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकरीही खुश
गुळाने केली शेतकऱ्याची दिवाळी गोड
Published on

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची लगबग पहायला मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळावर बनणारा गुळ हा भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर यंदाच्या हंगामातल्या पहिल्या गुळाचा सौदा आज संपन्न झाला.

कोल्हापुरातील विक्रम खाडे यांच्या अडत पेढीवर आज गुळाचा पहिला सौदा पार पडला.

खुपिरे तालुक्यातील शेतकरी अमित पाटील यांच्या गुळाला ४१०० रुपयांचा भाव मिळाला.

या भावामुळे दिवाळीत शेतकऱ्याला अच्छे दिन आले आहेत

कोल्हापूर बाजारपेठेत गुळाचे सौदे हे अतिशय पारदर्शक पद्धतीने केले जातात. प्रत्येक व्यापाऱ्याला या सौद्यात बोली लावण्याची संधी मिळते.

महत्वाची गोष्ट म्हणजे बोली लागल्यानंतर शेतकऱ्याला रोखीने पैसे दिले जातात.

शेतकरी अमित पाटील यांच्या घरात गेल्या ७० वर्षांपासून गुऱ्हाळावर गुळ तयार करण्याची परंपरा आहे.

आलेल्या गुळाचं बाजारपेठेत वजन केलं जात होतं. त्यामुळे गुळ दिवाळीत शेतकऱ्यांसाठी गोड आणि आनंदाची बातमी घेऊन आलाय असं म्हणावं लागेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in