Satara : मिनी काश्मीर हाऊसफुल्ल, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भन्नाट ठिकाण

-इम्तियाज मुजावर, सातारा
Published on
महाराष्ट्रातील मिनी कश्मीर म्हणजेच महाबळेश्वर आणि शेजारील पर्यटन ठिकाणं पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलीये.

सातारा, रत्नागिरी जिल्हयाच्या हद्दीवरील उंच डोंगरावर घनदाट जंगलात असणारा शिवरायांचा वासोटा किल्ला, शिवशंकराचे नागेश्वर व पर्वत मंदिर, शिड्यांसाठी प्रसिद्ध चकदेव म्हणजे ट्रेकर्ससाठी वेगळी पर्वणीच असून, या पर्यटस्थळांवर निसर्गासह येथील पारंपारीक नैसर्गिक वातावरण व अस्सल ग्रामीण जीवन याचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांचा वाढता ओघ दिसत आहे.

जलाशयातील बोटींगचा आंनद लुटण्यासाठी तापोळा, मुनावळे व विनायक नगर मठ येथील बोटिंग क्लबवर गर्दी होताना दिसत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पर्यटन व्यवसाय सुरु झाल्याय.

सलग मिळालेल्या सुट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गोवा, काश्मीरच काय तर निळ्या आभाळाच्या छताखाली, चोहोबाजूनी हिरव्यागार व घनदाट जंगलाने सजलेल्या डोंगररांगा आणि शिवसागर जलाशयाच्या अथांग जलाशयातील निळशार पाण्याच्या लाटेवर बोटीतुन प्रवास करणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो.

नाताळ सणाची पार्श्वभूमी व नवीन वर्षाची सुरुवात या सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचा कल तापोळा बामणोलीकडे वाढल्याने येथील अडचणीत आलेला व्यावसायिक काहीसा सुखावल्याचे दिसून येत आहे.

महिन्यापूर्वीच महाबळेश्वर पाचगणी तापोळा बामनोलीचे बुकिंग ऑनलाइन झाल्याने सध्या ऑनलाईनला महाबळेश्वर पाचगणी तापोळा बुकिंग फुल दिसू लागले आहे, तरी देखील प्रत्यक्ष पर्यटक या पर्यटन स्थळावर येऊन उपलब्ध असणारे हॉटेल बुकिंग करून मनमुराद सुट्टीचा आनंद घेऊ लागले आहेत.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in