शाहरुख-गौरीच्या 'मन्नत'चे Exclusive Photo, पाहा त्यांचा राजेशाही थाट

पाहा शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे खूप खास फोटो.
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे Exclusive Photo
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे Exclusive Photo(Aaj Tak)
Published on
(Aaj Tak)

शाहरुख खान हा भारतातील सर्वात मोठा स्टार आहे. देशभरात किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडच्या बादशहाला पाहण्यासाठी दररोज लाखो चाहते त्याच्या मन्नत बंगल्यावर पोहोचतात. मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे. शाहरुख खान या बंगल्यात अनेक वर्षांपासून राहत आहे. पाहा त्याच्या बंगल्याचे खास फोटो

(Aaj Tak)

शाहरुख खानचे घर मन्नत हे सुमारे 27 हजार स्क्वेअर फूटमध्ये बनवले आहे. त्याचे नाव व्हिला व्हिएन्ना असे होते. त्याचे मालक नरिमन दुबाश होते. या बंगल्यासमोर येस बॉस या चित्रपटाचे शूटिंग करताना शाहरुखला मन्नत फार आवडला. शेवटी त्याने बंगल्याच्या मालकाला भेटायचे ठरवले आणि त्यांच्याशी घर खरेदी करण्याबाबत बोलणी केली.

(Aaj Tak)

शाहरुख खानने हा बंगला 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून खरेदी केला होता. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा किंग खानने हा बंगला खरेदी करण्यासाठी जवळपास 13.32 कोटी रुपये दिले होते. यानंतर त्याने या बंगल्याला जन्नत असे नाव दिले होते. 2005 मध्ये करिअरमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने हे नाव बदलून 'मन्नत' ठेवले.

(Aaj Tak)

2022 मध्ये सलमान खानने सांगितले होते की, शाहरुखचे आलिशान घर मन्नत याआधी त्याला ऑफर करण्यात आले होते. मात्र वडील सलीम खान यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही ऑफर नाकारली होती. एका मुलाखतीत सलमान खानला विचारण्यात आले की, शाहरुखची अशी कोणती गोष्ट आहे जी त्याची इच्छा असती.

(Aaj Tak)

याला उत्तर देताना सलमान म्हणाला होता, त्याचा बंगला. पण ती (मन्नतची ऑफर) मला आधी आली होती. जेव्हा मी नुकतेच माझे करिअर सुरू केले होते. तेव्हा माझे वडील म्हणाले एवढ्या मोठ्या बंगल्यात तू एकटा काय करणार. मला शाहरुखला विचारायचे आहे, तो एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटा काय करतोस?'

(Aaj Tak)

मन्नत हा 1920 च्या दशकात बांधलेला ग्रेड 3 हेरिटेज व्हिला आहे. हे आधुनिक इटालियन आर्किटेक्चर आणि निओ शास्त्रीय घटकांसह बांधण्यात आलं होतं. हे विंटेज आणि आधुनिक शैलीतील इंटिरियरचे परिपूर्ण मिश्रण आहे. सहा मजल्यांच्या या बंगल्यात 5 खोल्या, जिम, स्विमिंग पूल, लायब्ररी आणि खाजगी चित्रपटगृह आहे.

(Aaj Tak)

शाहरुखचा मन्नत बंगला विकत घेतल्यानंतर त्याचे इंटीरियर त्याची पत्नी गौरी खान आणि Kaif Faqui नावाच्या आर्किटेक्ट आणि डिझायनरने डिझाइन केले होते. या बंगल्यात सहा मजले आहेत. या संपूर्ण बंगल्याचे इंटिरिअर करण्यासाठी एका दशकाचा वेळ लागला. कुटुंबाच्या प्रायव्हसीसाठी गौरीने मन्नतच्या टेरेसची खास रचना केली आहे. याच ठिकाणी शाहरुख खान त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येत असतो.

(Aaj Tak)

मन्नत हा आलिशान बंगला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट म्हणजे या बंगल्यात अनेक अनोखी पेंटिंग्ज आहेत. संगमरवरीपासून बनवलेल्या राधा कृष्णाच्या मूर्ती, पॅरिसहून विकत आणलेल्या चार फूट उंच फुलदाण्या आणि जेड स्टोनपासून बनवलेली गणपतीची मूर्तीही आहे.

(Aaj Tak)

शाहरुख खानचे ऑफिसही मन्नतमध्ये आहे. शाहरुखही येथे महत्त्वाच्या बैठका घेतो. या कार्यालयात आर्ट पीस आणि फॅमिली फोटो आहेत. यासोबतच बंगल्यात एक अवॉर्ड रूम देखील आहे, ज्यामध्ये शाहरुख खानला मिळालेले सर्व पुरस्कार ठेवले आहेत. पठाणच्या यशानंतर शाहरुखने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, त्याच्या घरात रडण्यासाठी बाथरूम आहे. जेव्हा तो अस्वस्थ असतो तेव्हा तो या बाथरूममध्ये रडतो.

(Aaj Tak)

2016 मध्ये आर्किटेक्ट राजीव पारेख यांनी मन्नतचे नूतनीकरण केले होते. आज मन्नतची किंमत ही तब्बल 200 कोटी रुपये आहे. तर मन्नतच्या बाहेरील नेमप्लेट ही हिऱ्याची आहे. त्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. मन्नत व्यतिरिक्त शाहरुख खानकडे दिल्ली आणि लंडनमध्येही आलिशान घरे आहेत.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in