Ganpati visarjan : 'धरिले म्यां तव चरण। आतां कैचें ये मरण'; बाप्पाच्या निरोपाचे क्षण पहा कॅमेऱ्याच्या नजरेतून

Ganpati visarjan 2022 photos : गणरायाला निरोप देण्यासाठी लोटली अलोट गर्दी
Ganpati visarjan 2022
Ganpati visarjan 2022फोटो/साईप्रसाद पाटील
Published on
कोरोनाच्या विघ्नामुळे गेल्या दोन वर्षात साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाची कसर यंदा गणेशभक्तांनी भरू काढली. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात मुंबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा झाला आणि वाजत गाजत आणि जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. मुंबईत गणेशोत्सवाची विशेष धूम बघायला मिळाली.

कोरोना निर्बंधांविना गणेशोत्सव साजरा केल्यानंतर मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीच्या (९ सप्टेंबर) दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. बाप्पाच्या निरोपामुळे मुंबईतील रस्त्यांपासून ते गल्लीबोळापर्यंत वाद्य आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमून गेल्या.

गुलाल आणि फुलांची उधळण करत मुंबईतून गणपतीच्या विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. मुंबईतील महत्त्वाच्या गणपतींसह ठिकठिकाणच्या गणपतींचं विसर्जन सकाळपासून सुरू झाले आणि मध्यरात्री लोटून गेल्यानंतरही मुंबापुरी गणपती बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेली.

लालबागचा राजासह गणेशगल्ली येथील मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया मेन्शनच्या गणपतीला निरोप देण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच अलोट गर्दी केली होती.

फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल-ताशे, डीजेच्या दणाणून सोडणाऱ्या गजरात मिरवणुका मार्गस्थ झाल्या होत्या.

पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घातल विघ्नहर्त्या गणरायला निरोप देण्यासाठी हजारो मुंबईकरांनी गिरगाव चौपटीसह विविध विसर्जन ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.

तव चरण शरण आतां । विघ्नाची नुरवी वार्ता॥
धरिले म्यां तव चरण । आतां कैचें ये मरण॥
असं म्हणत मुंबईकरांनी बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला. बाप्पाच्या निरोपांचे हे क्षण टिपलेले आहेत छायाचित्रकार साईप्रसाद पाटील यांनी!
तव चरण शरण आतां । विघ्नाची नुरवी वार्ता॥ धरिले म्यां तव चरण । आतां कैचें ये मरण॥ असं म्हणत मुंबईकरांनी बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला. बाप्पाच्या निरोपांचे हे क्षण टिपलेले आहेत छायाचित्रकार साईप्रसाद पाटील यांनी!
Mumbai Tak
www.mumbaitak.in