पूर्वमोसमी पावसाची महाराष्ट्राकडे पाठ अन् दिल्लीत तांडव; ही दृश्ये बघा...

monsoon Updates : भाजप खासदाराच्या गाडीवर उन्मळून पडलं झाड, दिल्लीत प्रचंड नुकसान
पूर्वमोसमी पावसाची महाराष्ट्राकडे पाठ अन् दिल्लीत तांडव; ही दृश्ये बघा...
Photos/PTI
Published on
मॉन्सूनने केरळात धडक दिल्याने सगळेच सुखावले असले, तरी पूर्वमोसमी पावसाने यंदा महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. तर दिल्लीत मात्र, पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजर लावली.
मॉन्सूनने केरळात धडक दिल्याने सगळेच सुखावले असले, तरी पूर्वमोसमी पावसाने यंदा महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे. तर दिल्लीत मात्र, पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजर लावली. Photos/PTI
मॉन्सूनच्या आगमनापूर्वी पूर्वमोसमी पाऊस झाल्यानं नागरिकांना उकाड्यातून काही अंशी दिलासा मिळतो. मात्र, यंदा महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने हुलकावणी दिलीये.

दिल्लीत सोमवारी पूर्वमोसमी पावसाने कहर केला. वादळी वारे आणि पावसाने दिल्ली-एनसीआरमध्ये दाणादाण उडवली. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली.

दिल्लीतील विविध भागात झाडं उन्मळून गाड्यांवर कोसळली. दिल्लीत सोमवारी १०० किमी प्रति तास वेगाने वारे सुटले होते. या वादळी पावसात जामा मशिद भागात एका व्यक्तीचा घराची बाल्कनी कोसळून मृत्यू झाला.

भाजपचे खासदार साहिब सिंग यांनाही पूर्वमोसमी पावसाचा फटका बसला. वादळामुळे झाडं कोसळून साहिब सिंह यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं. समोरच्या काचेवरच झाड उन्मळून पडल्यानं कारचा चक्काचूर झाला.

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने सगळीकडेच गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली.

दिल्लीतील रायसीना रोड परिसरातही पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं. रस्त्यावर असलेलं ट्रॅफिक बूथ कोसळून रस्त्यावर आला.

पूर्वमोसमी पावसामुळे दिल्लीतील पारा मात्र कमी झाला. सोमवारी दिल्लीत किमान तापमान २७.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.

हवामान विभागाने आजही (३१ मे) दिल्लीतील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे.

सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे दिल्लीतील काही भागात पाणी साचलं होतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.
सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे दिल्लीतील काही भागात पाणी साचलं होतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.Photos/PTI

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in