अंबरनाथहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी 13 बस पैकी 12 पोहचल्या आणि एका भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर घडली आहे. तसेच या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सिन्नरच्या एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ एमआयडीसी मधील महालक्ष्मी नावाची कंपनी आहे, या कंपनीचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ते दरवर्षी भाविकांना शिर्डी घेऊन जातात.
यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर भागातील नागरिकांचा समावेश असतो. यावर्षी अंबरनाथ मोरीवली ते शिर्डी दर्शनासाठी 13 बस घेऊन गेले होते. यातील 12 बस शिर्डी पोहोचल्या मात्र एक बसच्या अपघात झाला.
बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली ज्यामध्ये बसचा चक्काचूर झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दहा जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये दोन पुरुष, 6 महिला तर दोन चिमुकल्याचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातातील मृतांची यादी:
1. प्रमिला प्रकाश गोंधळी (वय 45 वर्ष, रा. अबंरनाथ)
2. वैशाली नरेश उबाळे (वय 32 वर्ष, रा. अबंरनाथ)
3. श्रावणी सुहास बारस्कर (वय 30 वर्ष, रा. अबंरनाथ)
4. श्रध्दा सुहास बारस्कर (वय 4 वर्ष, रा. अबंरनाथ)
5. नरेश मनोहर उबाळे (वय 38 वर्ष, रा. अबंरनाथ)
6. बालाजी कृष्णा मोहंती (ड्रायव्हर) (वय 25 वर्ष)
7. दिक्षा संतोष गोंधळी (वय 18 वर्ष, रा. कल्याण)