'लालपरी'वर काळाची झडप! प्रवाशांचे मृतदेहच पोहोचले घरी, अंगावर शहारे आणणारी दृश्ये

MSRTC bus falls into Narmada river : अमळनेर आगाराची बस मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात नर्मदा नदी पडली
MSRTC bus falls into Narmada river in Madhya Pradesh

Published on
मध्य प्रदेशातील इंदूर येथून एसटी महामंडळाची एसटी बस महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे निघाली. सकाळी ७.३० वाजता लालपरीने इंदूर सोडलं, पण पोहोचलीच नाही.

अमळनेरकडे भरधाव वेगाने निघालेली बस धार आणि खगगोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या काठावर आली. नदीपात्रावरील पुलावरून जात असतानाच एसटी बस पुलाचा कठडा तोंडून खाली असलेल्या खडकावर कोसळली आणि नदीत बुडाली.

अवघ्या काही सेंकदात बसने जलसमाधी घेतली आणि बसमधील १३ प्रवासी जागीच गतप्राण झाले. सकाळी १० ते १०.१५ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य हाती घेतलं.

दुपारी तीन वाजेपर्यंत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढली. या भीषण अपघातात बसचा सांगाडाच शिल्लक राहिला होता. या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही जण असून, काही राज्यस्थान आणि मध्य प्रदेशातील आहे.

इंदूरचे विभागीय आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. ज्या पुलावर हा अपघात घडला, तो मुंबई आग्रा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग ३) आहे.

शर्मा यांच्या माहितीप्रमाणे इंदूर येथून बस रवाना झाली, त्यावेळी बसमध्ये १३ प्रवासी होते. प्रशासनाला १३ जणांचेही मृतदेह सापडले आहेत. मात्र, रस्त्यात एक दोन प्रवासी बसले असावेत अशी शंका असून, प्रशासनाकडून नदीत शोध घेतला जात आहे.

बसच्या अपघाताची भीषणता प्रत्यक्षदर्शींनी सांगितली. बस पुलावरून कोसळल्यानंतर खाली खडकावर आदळली. त्यामुळे बसचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर पलटी होऊन बस पाण्यात जाऊन बुडाली. प्रत्यक्षदर्शींनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

बस अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी काहीजणांची ओळख पटली आहे. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक) यांचे मृतदेह सापडले.

त्याचबरोबर चेतन राम गोपाल जांगीड (वय ७०, रा. नांगल कला, गोविंदगड, जि. जयपूर, राजस्थान), प्रकाश श्रवण चौधरी (वय ४०, शारदा कॉलनी, अमळनेर जि. जळगाव), लिंबाजी आनंद पाटील (वय ६०, पिलोदा, अमळनेर, जि. जळगाव), कमला लिंबाजी पाटील (वय ५५, पिलोदा, अमळनेर, जि. जळगाव), चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, अमळनेर, जि. जळगाव) या मृतांची ओळख आधार कार्ड आधारे पटवण्यात आली आहे.

अरवा मुर्तझा बोरा (वय २७, मूर्तिजापूर, अकोला) आणि सैफुद्दीन अब्बास नुरानी नगर, इंदूर यांची ओळख नातेवाईकांच्या मदतीने पटवण्यात आली आहे.

उर्वरित मयतांची ओळख पटवली जात असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारनेही प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in