Mumbai bomb blast : 19 वर्ष लोटलीत, पण ही दृश्ये बघून मुंबईकरांच्या अंगारवर आजही येतात शहारे

Mumbai bomb blast History : 25 ऑगस्ट २००३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांनी हादरली होती मुंबई
Mumbai bomb blast 2003 History
Mumbai bomb blast 2003 History
Published on
२५ ऑगस्ट २००३! ही तारीख मुंबई आणि महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. एकापाठोपाठ एक अशा साखळी बॉम्बस्फोटांनी पूर्ण मुंबई हादरली होती. ऑगस्टमध्ये मुंबई झालेल्या कार बॉम्बस्फोटात तब्बल ५४ लोक मरण पावले होते, तर २४४ लोक जखमी झाले होते.

यातील एक बॉम्बस्फोट झाला होता, गेटवे ऑफ इंडिया आणि दुसरा बॉम्बस्फोट झाला होता झवेरी बाजार परिसरात. मुंबईत २००३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेला आता १९ वर्ष झाली आहेत. बॉम्बस्फोट झाल्यानंतर भंयकर दृश्ये होती.

२५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबई पहिला बॉम्बस्फोट झाला होता, तो झवेरी बाजारमध्ये. एका टॅक्सीमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. यात २९ लोकांचा मृत्यू झाला होता. हा बॉम्बस्फोट इतका भंयकर होता की, २०० मीटर परिसरातील ज्वेलरी शॉप्सच्या काचा फुटल्या होत्या. शेकडो लोक जखमी झाले होते.

दुसरा बॉम्बस्फोट झाला होता गेटवे ऑफ इंडिया येथे. झवेरी बाजारमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलीस आणि आपातकालीन विभाग मदतीसाठी धावलेले असतानाच काही क्षणात हा स्फोट झाला होता.

गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच हा स्फोट झाला होता. लोकांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या या ठिकाणीही टॅक्सीमध्येच बॉम्बस्फोट झाला होता. यात २५ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० लोक जखमी झाले होते. झवेरी बाजार आणि गेटवे ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला होता.

दोन्ही बॉम्बस्फोट घडवण्यामागची पद्धत एकच होती. बॉम्ब टॅक्सीमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि टाइम सेट करण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या तपासात तेव्हा यश मिळालं, जेव्हा गेटवे ऑफ इंडियाजवळ स्फोट झालेल्या टॅक्सी चालक वाचला. टॅक्सी चालकाच्या माहितीनुसारच संशयितांना शोधण्याता आलं होतं.

मुंबई पोलिसांनी २००३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तीन आरोपींना अटक केली होती. यात अशरफ अन्सारी, हनीफ सय्यद आणि त्याची पत्नी फहमिदा सय्यद अशी त्यांची नावं होती. पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आलं की अन्सारी हनीफ सय्यद हा त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलांसह टॅक्सीतून गेटवे ऑफ इंडिया येथे गेले. सोबत असलेली बॉम्बची बॅग टॅक्सी ठेवून ते निघून गेले.

हनीफ, फहमिदा आणि अशरफ या तिघांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला आणि बॉम्बस्फोट घडवून आणले. हे तिघेही पाकिस्तानस्थितर दहशतवादी संघटना लश्कर सोबत जोडले गेलेले होते, असंही तपासातून समोर आलं. मुंबई विशेष पोटा न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणात तिघांना दोषी ठरवलं आणि ६ ऑगस्ट २००९ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.

Mumbai Tak
www.mumbaitak.in