Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा का केला जातो?

लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळ्या उत्साहात पडला पार
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा का केला जातो?
Published on
मुंबईतील मानाचा आणि 'नवसाला पावणारा बाप्पा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'लालबागचा राजा' गणपतीचा पाद्यपूजन सोहळा शनिवारी (११ जून) पार पडला.

पाद्यपूजन सोहळा पार पडला की लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते.

पाद्यपूजन सोहळ्यानिमित्त शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या कालावधीत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

लालबागचा राजा गणपती उत्सवाचे हे ८९वे वर्षे असून, सकाळी दहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन म्हणजेच पाद्यपूजन सोहळा आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

पावसाळ्याचं आगमन झाल्यानंतर लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात.

लालबागच्या राजा गणपती मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजाच्या भक्तांमध्ये या सोहळ्याचं खास स्थान आहे.

मागील दोन वर्षे गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध होते त्यामुळे लालबागचा राजाचं दर्शन भाविकांना प्रत्यक्षात घेता आलं नाही.

यावर्षी निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा केला जाण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे उत्साह गणेशभक्तांमध्ये आहे.

लालबाग राजा पाद्यपूजन सोहळ्याचे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक पेज, ट्विटर, यु ट्यूब वरून प्रक्षेपण करण्यात आलं.

लालबागचा राजा गणपती नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे दर्शनाला देशभरातून भक्त येतात.

Mumbai Tak
www.mumbaitak.in