पंचायत 2: पाण्याच्या टाकीवर सचिवजींना भेटलेल्या रिंकीचा रियल लाइफ बोल्ड अवतार

पंचायत 2 वेबसीरीजमधील रिंकी म्हणजेच अभिनेत्री सान्विका हिची बराच चर्चा सुरु आहे. जाणून घ्या तिच्याविषयी सविस्तर.
पंचायत 2: पाण्याच्या टाकीवर सचिवजींना भेटलेल्या रिंकीचा रियल लाइफ बोल्ड अवतार
panchayat season 2 actress sanvikaa rinki profile instagram pics jitendra kumar(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)
Published on
(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

अमेझॉन प्राइम व्हीडिओवर पंचायत या प्रसिद्ध वेब सीरीजचा दुसरा सीझन रिलीज झाला आहे.अभिषेक त्रिपाठी (सचिव) आणि फुलेरा गावातील आयुष्य याची कहाणी अनेकांना प्रचंड आवडत आहे. पंचायत 2 मध्ये प्रधानाजींची मुलगी रिंकीसोबत सचिव अभिषेक त्रिपाठी यांचा एक वेगळा अँगल दाखवण्यात आला आहे. तर जाणून घ्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील रिंकी आहे तरी कोण?

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

रिंकी आणि सचिवजी यांची पहिली भेट ही पाण्याच्या टाकीवर होते. जिथून दुसऱ्या सीझनची सुरुवात आहे. त्यानंतर रिंकीचं कॅरेक्टर कसं पुढे-पुढे जातं हे सीरीज पाहिल्यानंतर समजेलच.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

अभिनेत्री सान्विका हिने रिंकीची भूमिका जबरदस्त साकारली आहे. रिंकी ही ऑन स्क्रीन लोकांना आवडू लागली आहे. या भूमिकेला मिळत असलेला प्रतिसाद यामुळे सान्विका खूपच खुश आहे.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

सान्विकाच्या रियल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तिचं इंस्टाग्राम अकाउंटवरुनच तिच्याबाबत समजू शकतं. ती रियल लाइफमध्ये खूपच फॅशनेबल आहे. इंस्टाग्रामवर तिचे 62 हजार फॉलोवर्स आहेत. पण तरीही सोशल मीडियावर ती फारशी अॅक्टिव्ह नसते.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

तिने एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं की, तिने आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सान्विकाच्या मते, शिक्षण पूर्ण झाल्यावर नेमकं काय करावं याबाबत ती जरा कन्फ्यूज होती. तिला साचेबद्ध पद्धतीने नोकरी करायची नव्हती. अशातच तिला तिच्या मैत्रिणीने मुंबईला बोलावून घेतलं.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

मनोरंजन क्षेत्रात आपण काम करावं अशी तिची इच्छा होती. सान्विकाने वेबसीरीज पंचायतमधील कामाचा अनुभव खूपच चांगला असल्याचं सांगितलं आहे. तिने दिग्दर्शक दीपक कुमार यांचं बरंच कौतुक केलं आहे. त्यांच्यामुळेच आपण या भूमिकेला न्याय देऊ शकलो असं तिचं म्हणणं आहे.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

मनोरंजन क्षेत्रात आपण काम करावं अशी तिची इच्छा होती. सान्विकाने वेबसीरीज पंचायतमधील कामाचा अनुभव खूपच चांगला असल्याचं सांगितलं आहे. तिने दिग्दर्शक दीपक कुमार यांचं बरंच कौतुक केलं आहे. त्यांच्यामुळेच आपण या भूमिकेला न्याय देऊ शकलो असं तिचं म्हणणं आहे.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

याशिवाय सान्विकाने पंचायत सीझन 2 च्या शूटिंगमधील सर्वात मजेदार क्षणांबद्दल देखील सांगितले आहे. 'जेव्हा आम्ही सेटवर असायचो तेव्हा मजा यायची. नेहमी काहीतरी चालू असायचे. पण रघुबीर सर सेटवर असताना सगळ्यात जास्त मजा यायची. ते नेहमी गात असायचे, विनोद करायचे, दुसरा सर्वात मजेदार भाग म्हणजे जीतूसोबत काम करणं. खऱ्या आयुष्यात आम्ही कमी बोललो आहे, पण जेव्हा कधी एकमेकांना बघायचो तेव्हा हसायचो. एखादा सीन असायचा तो देखील हसत-हसत पार पडायचा.

(फोटो सौजन्य: Sanvikaa /instagram)

पंचायतच्या तिसऱ्या सीझनची अद्याप घोषणा झालेली नाही. पण यापुढेही सचिवजी आणि रिंकीची प्रेमळ स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. सान्विकाच्या मते, तिला रोमँटिक भूमिका करायला आवडत नाही. पण तिची रिंकीची भूमिका ही सगळ्यांनाच फार आवडत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in