पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

मुंबई-पुणे महामार्गावर कामशेतजवळ मध्यरात्री घडला होता अपघात
पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला
Published on

मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत गावाजवळ मध्यरात्री पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात घडला. या टँकरमध्ये १२ हजार लिटर पेट्रोल होतं.

या अपघातात टँकच्या पुढील भागाचा चेंदामेंदा तर झालाच पण काही पेट्रोल रस्त्यावर पडल्यामुळे कामशेतजवळील काही भाग हा निसरडा झाला होता.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.

या घटनेनंतर पोलीस प्रशासन, आय.आर.बी. आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

अपघाताची तीव्रता पाहता पोलिसांनी दोन तास कामशेतजवळचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता.

ज्यामुळे सकाळी काही वेळासाठी या भागात वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.

परंतू मोक्याच्या क्षणी पोलिसांनी समयसूचकता दाखवून केलेल्या कामामुळे मोठा अपघात टाळला गेला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in