आसामच्या डारंग जिल्ह्यात एक व्यक्ती पोत्यातून तब्बल ९० हजार रुपयांची चिल्लर घेऊन स्कुटी खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये गेला.
मोहम्मद सैदुल हक नावाचा हा व्यक्ती गुवाहटीमध्ये एक छोटसं दुकान चालवतो. तो मागील ५ ते ६ वर्षांपासून ५ रुपये आणि १० रुपयांची चिल्लर जमा करत आहे.
मागील अनेक वर्षांपासून पैशांची बचत करुन मंगळवारी ते स्कुटी खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये पोहचले.
सैदुलच्या हातातील पैशांचं पोत बघून शोरुममधील सेल्स एक्झिक्यूटिव्ह गोंधळून गेला होता.
शोरुमचे मालक मनिष पोद्दार म्हणाले, सैदुलने आणलेले पैसे मोजण्यासाठी कर्माचाऱ्यांना अनेक तास लागले.
सैदुल हकने म्हणाला की त्यांचं अनेक दिवसांपासून स्कुटी खरेदी करण्याचं स्वप्न होतं.