महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याची प्रतिक्षा संपणार आहे.
अनेक वर्षांपासून समृद्धी महामार्गाची चर्चा सुरू आहे. हा महामार्ग 11 डिसेंबर रोजी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण केलं जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचं स्टेरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होतं.
नागपूर येथील झिरो पॉईंट ते शिर्डी असा हा पाहणी दौरा आहे.
पहिल्या टोल नाक्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात शिर्डीपर्यंतचा महामार्ग आणि सुविधांची पाहणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करणार आहेत.