'...म्हणून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला'; आंदोलनावर शरद पवारांचं गंभीर विधान

Shara pawar : शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांकडे बोट
'...म्हणून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला'; आंदोलनावर शरद पवारांचं गंभीर विधान
Published on

राज्यात पाच महिन्यांपासून एसटी कामगार संपावर आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिलेले असताना आज पुन्हा एकदा संपकरी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

संपकरी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक दिली आणि आंदोलन केलं.

या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

एसटी महामंडळाचं शासना विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीवर आपण ठाम असल्याचं आंदोलकांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

यावेळी बराच गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना नाव न घेता लक्ष्य केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in