प्रतापगड शिवमय! शिवप्रताप दिनानिमित्त हजारो शिवभक्त गडावर

shiv pratap din 2022 at pratapgarh photos : शिवप्रताप दिन सोहळा
प्रतापगड शिवमय! शिवप्रताप दिनानिमित्त हजारो शिवभक्त गडावर
Published on
ढोल ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष, रोमरोमात हर्ष निर्माण करणाऱ्या तुताऱ्यांचे गगनभेदी आवाज, शिवकालीन धाडसी खेळांची प्रात्यक्षिक आणि अलोट गर्दीच्या साक्षीने किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा होत आहे.

बुधवार (30 नोव्हेंबर) पहाटेपासूनच मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींनी परिसर भारुन गेला आहे.

सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात पूजा बांधण्यात आली. जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आलं.

मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली.

शिवप्रताप सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी आणि हा आगळा वेगळा सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक प्रतापगडावर दाखल आहेत.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in