सुरत, गुवाहटी, गोवा अन् महाराष्ट्र; एकनाथ शिंदेंनी गड जिंकला!

गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर असलेले एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रात आले.
Eknath Shinde
Eknath ShindeMumbai Tak
Published on
एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर
एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर

गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राबाहेर असलेले एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रात आले. गोव्यामधून आज सकाळीच ते महाराष्ट्राकडे निघाले होते.

एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर
एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर

मुंबई विमान तळावर आल्यानंतर एकनाथ शिंदेंना आणायला भाजपचे नेते पोहोचले होते. आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड शिंदेंना आणयला विमानतळावर गेले होते.

शिवसैनिकांना अभिवादन
शिवसैनिकांना अभिवादन

एकनाथ शिंदेंनी विमान तळावर बाहेर पडल्यानंतर आपल्या कार्यकर्तांना अभिवादन केले. शिंदेंच्या स्वागतासाठी अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेट
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेट

एकनाथ शिंदे मुंबईमध्ये येताच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थीत होते.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेट
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थीत
भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थीत

एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर आले तेव्हा...केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड उपस्थीत होते.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला
एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला

फडणवीसांची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी भाजपचे अन्य नेतेही उपस्थीत होते.

भाजपचे सर्व नेते उपस्थीत
भाजपचे सर्व नेते उपस्थीत

राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना पेढे भरवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मागच्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे राजभवनला कधी येणार अशा चर्चा होत्या. आठ दिवस महाराष्ट्राबाहेर राहिल्यानंतर एकनाथ शिंदे आज मुंबईत आणि राजभवनला आले होते.

मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्य़ानंतर पत्रकारांशी संवाद
मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्य़ानंतर पत्रकारांशी संवाद

पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्टोक खेळत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. कोणलाच अपेक्षा नव्हती की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील.

बंडखोर आमदारांचा जल्लोष
बंडखोर आमदारांचा जल्लोष

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर गोव्यामध्ये असलेले बंडखोर आमदारांना जल्लोष केला. काही आमदारांनी गाणी लावून जोरदार डान्स केला.

एकनाथ शिंदेंच्या शपथविधीची तयारी
एकनाथ शिंदेंच्या शपथविधीची तयारी

राजभवनावर एकनाथ शिंदेंच्या शपथविधीची तयारी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in