...अन् तिघांचे मृतदेहच मिळाले; ताम्हीणी घाटातील अपघाताची थरकाप उडवणारी दृश्ये

Tamhini Ghat car accident : जीव वाचवण्यासाठी भरधाव कारमधून घेतल्या उड्या, दगड-झाडांवर आदळले
Tamhini Ghat car accident photos
Tamhini Ghat car accident photos
Published on
ऋषभ किशोर चव्हाण (वय  24), कृष्णा पंडित राठोड (वय  27), सौरभ श्रीकांत भिंगे (वय  25), रोहन परशुराम गाडे (वय 26), प्रवीण गजानन सरकटे (वय  26) रोहन किशोर चव्हाण (वय  22) (सर्व रा. मंगळूरपीर, जि. वाशिम) सर्व मित्र वर्षा पर्यटनानिमित्त कारने फिरायला निघाले.

स्विफ्ट गाडीने (क्र MH 12 HZ 5535) देवकुंडच्या दिशेने निघाले. पुणे ओलांडलं आणि ताम्हीणी घाट लागला. डोंगर दऱ्यातून कोसळणाऱ्या धबधब्यांनी भुरळ घालली. आजूबाजूला हिरवीगर्द झाडी, सगळं मोहून टाकणारं वातारवण होतं. त्यामुळे निसर्ग पर्यटनाचा आनंद घेत ते निघाले होते.

सहा जण वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले, मात्र नियतीच्या मनात भलतंच सुरू होतं. ताम्हीणी घाटात नको तेच घडलं. कारचा चक्काचूर झाला. सहा जण सहा ठिकाणी पडले. शोधल्यानंतर तिघांचे फक्त मृतदेहच हाती लागले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी 'मुंबई Tak'शी बोलताना घडलेल्या दुर्घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सहा तरुण कारमधून पुण्यावरून देवकुंडच्या दिशेने निघाले होते. शनिवारी दुपारी ४.३० वाजता कोंडेथर-सणसवाडी गावाच्या हद्दीतील दरीत त्यांचा अपघात झाला.

गाडीत समोर दोघे, तर मागे चौघे जण बसले होते. ताम्हीणी घाटातून जात होते. डोंगराच्या काठावर जाऊन फोटो काढण्यासाठी ते कार त्या दिशेनं घेऊन जात होते. टोक जवळ येत असतानाच निसरडा रस्ता आणि चिखलामुळे कारची चाकं घसरू लागली आणि कारवरील नियंत्रण गेलं.

कार दरीच्या दिशेनं जाऊ लागल्यानं मागे बसलेल्या चौघांनी दरवाजे उघडले. त्याच दरम्यान कार ७०० फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, कार खाली जात असतानाच मागे बसलेल्या चौघांनी बाहेर उड्या मारल्या. पण तेही डोंगरावरून घसरून दरीत कोसळले. खाली कोसळतानाच ते दगडावर आदळून झाडांमध्ये अडकले.

मागे बसलेल्या चौघांनी उड्या मारल्या पण समोर बसलेले दोघे अडकले आणि ते कारबरोबर दरीत कोसळले. कार खाली दरीतून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पडली आणि मोठ्या दगडात अडकली. रस्त्याकडेला दुर्घटनाग्रस्त कार बघून लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, डोंगर कपारीवरून दरीत कोसळलेल्या कारचा सांगडाच शिल्लक राहिला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर दरीत अडकलेल्या एका तरुणाने झाडाची फांदी हलवून मदत मागितली. त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मदत पथकांना पाचारण करण्यात आलं. तीन बचाव पथकांनी सहा तरुणांना मध्यरात्री दीडपर्यंत बाहेर काढलं.

या घटनेत ऋषभ किशोर चव्हाण, कृष्णा पंडित राठोड, सौरभ श्रीकांत भिंगे या तीन तरुणांचा जागेवरच मृ्त्यू झाला. तर रोहन परशुराम गाडे (ड्रायव्हर), प्रवीण गजानन सरकटे, रोहन किशोर चव्हाण हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai Tak
www.mumbaitak.in