Tokyo Olympics 2020: एक असा विजय जो पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील!

Indian Hockey Olympics: भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक असा विजय मिळवला आहे की, जो पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील.
Tokyo Olympics 2020: एक असा विजय जो पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील!
तब्बल 41 वर्षानंतर भारताने हॉकीमध्ये पटकावलं पदक(Photo: Sehadri Sukumar)
Published on
 भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने (Team India) जवळपास 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने (Team India) जवळपास 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली आहे. (Photo: Sehadri Sukumar)
सुमारे 41 वर्षांनी ऑलिम्पिक इतिहासात गोलपोस्टवर झालेली कोंडी फोडण्यात भारतीय हॉकी संघाला यश आलं आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदाच्या सामन्यात जर्मनीवर 5-4 अशी मात करत पदकावर आपलं नाव कोरलं आहे.
सुमारे 41 वर्षांनी ऑलिम्पिक इतिहासात गोलपोस्टवर झालेली कोंडी फोडण्यात भारतीय हॉकी संघाला यश आलं आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने कांस्यपदाच्या सामन्यात जर्मनीवर 5-4 अशी मात करत पदकावर आपलं नाव कोरलं आहे.(Photo: Sehadri Sukumar)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवत कांस्यपदक पटकावलं आहे. भारतीय संघाने या सामन्यात जर्मनीचा 5-4 असा पराभव केला आहे. सुरुवातीला मागे पडल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि पदकही पटकावलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीसारख्या बलाढ्य संघाला नमवत कांस्यपदक पटकावलं आहे. भारतीय संघाने या सामन्यात जर्मनीचा 5-4 असा पराभव केला आहे. सुरुवातीला मागे पडल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि पदकही पटकावलं आहे.(Photo: Sehadri Sukumar)
1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक पटकावलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आलेली नव्हती. मात्र, यंदा हॉकी संघाने आपला इतक्या वर्षाचा काळा इतिहास पुसून काढला आहे.
1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने हॉकीत शेवटचं पदक पटकावलं होतं. यानंतर भारतीय संघाला एकदाही पदकाची कमाई करता आलेली नव्हती. मात्र, यंदा हॉकी संघाने आपला इतक्या वर्षाचा काळा इतिहास पुसून काढला आहे. (Photo: Sehadri Sukumar)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. कारण भारतीय हॉकी संघाने पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यांचा हा विजय संपूर्ण भारतीय हॉकी खेळाडूंना एक नवा विश्वास देणारा ठरणारआहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तब्बल 41 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. कारण भारतीय हॉकी संघाने पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यांचा हा विजय संपूर्ण भारतीय हॉकी खेळाडूंना एक नवा विश्वास देणारा ठरणारआहे. (Photo: Sehadri Sukumar)
या ऐतिहासीक विजयानंतर भारतीय संघावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दिग्गज भारतीय नेत्यांपासून ते क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या ऐतिहासीक विजयानंतर भारतीय संघावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दिग्गज भारतीय नेत्यांपासून ते क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(Photo: Sehadri Sukumar)
भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळेच जण कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत सगळेच जण कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Sehadri Sukumar)
जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. मात्र असं असताना देखील भारतीय हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत जर्मनीवर एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
जर्मनीचा संघ हॉकीत गतीशील आक्रमणासाठी ओळखला जातो. मात्र असं असताना देखील भारतीय हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत जर्मनीवर एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. (Photo: Sehadri Sukumar)

Related Stories

No stories found.