सकाळी उन्हाच्या झळा, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस; कोल्हापुरांची फजिती

Unseasonal rain in kolhapur : ढगांच्या गडगडाटासह कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी
सकाळी उन्हाच्या झळा, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस; कोल्हापुरांची फजिती
Published on

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली. कोल्हापुरकरांनाही उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असून, शनिवारी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने राज्यातील काही भागात गडगडाटासह पावसाचा इशारा दिलेला असून, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

सकाळपासूनच तापमान वाढलेलं असल्याने दुपारपर्यंत अंगाची काहिली झालेल्या कोल्हापूरकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या सरींनी चांगलीच फजिती झाली.

सायंकाळच्या सुमारास शहरात जिल्ह्यात ढग दाटून आले आणि त्यानंतर वारे वेगाने वाहण्यास सुरूवात झाली.

वाऱ्याच्या वेगाबरोबरच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही सुरू झाला. त्यानंतर पावसाला सुरूवात झाली.

१९ ते २१ मार्च या कालावधीत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण कोकणसह दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.

वाढत उन्हं आणि पाऊस कोसळेल याचा अंदाज नसल्यानं अनेकजण कामानिमित्त बाहेर पडलेले होते. त्यांची पावसाने चांगलीच तारांबळ उडवली.

अनेकांना आजूबाजूच्या दुकानात आसरा घ्यावा लागला.

कोल्हापुरात सायंकाळी झालेल्या पावसा दरम्यानची काही दृश्ये....

Mumbai Tak
www.mumbaitak.in