श्री. विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न!

Shri Vitthal Rukmini marriage : पंढरपूरमध्ये वसंत पंचमीचे औचित्य साधून दरवर्षी मंदिरामध्ये श्री. विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
श्री. विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न!
श्री. विठ्ठल रखुमाईचा शाही विवाह सोहळा थाटात संपन्न!Mumbai Tak
Published on

वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा अतिशय भक्तिमय आणि जल्लोषात पार पडला.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे.

या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो.

त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या विवाह सोहळ्याचे निमित्ताने संपूर्ण मंदिर आज आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडला.

लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात.

या सोहळ्यानंतर मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडींना दिवसभर जेवण ठेवलेले असते.

लग्नाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

आज पासून रंगपंचमी पर्यंत देवाला दररोज पांढरा पोशाख केला जाणार आहे आणि या पोशाखावर रोज केशर पाणी आणि गुलाल टाकण्याची परंपरा आहे.

या सोहळ्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून भागवाचार्य अनुराधा शेटे यांचे श्री रुक्मिणी स्वयंवर हे कथानक ठेवण्यात आले आहे.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in