मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची नजर खिळवून ठेवणारी दृश्ये

धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची नजर खिळवून ठेवणारी दृश्ये
Published on

गुलाब चक्रीवादळामुळे पडत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील सर्व नद्या-नाले आणि धरणं तुडुंब भरुन वाहत आहेत.

मराठवाड्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेलं जायकवाडी धरणंही तुडुंब भरलेलं असून त्यामधून पाण्यासा विसर्ग सुरु झाला आहे.

धरणाच्या वरील भागातून एक लाख ३८ हजार क्युसेसने पाण्याची प्रचंड प्रमाणात आवक होत असल्याने जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे बुधवारी सकाळी अकरा वाजता अर्धा फुटाने उचलून दहा हजार क्युसेसने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

विसर्ग सुरु करण्यात असल्याने प्रशासनाच्या वतीने गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या धरणात एक लाख ३८ हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरु असून धरण ९५ टक्के भरल्याने स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन पाण्याची आवक वाढल्यास सांयकाळ पर्येंत विसर्गात मोठी वाढ केली जाईल असे पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पर्यटक व नागरीकांनी दुचाकी व चारचाकी वाहणे धरण परीसरात आणु नये यासाठी जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पैठण पोलिसांनी बँरीकेट लावले असुन मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in