मुंबई तक
गणेशोत्सव हा 10 दिवसापर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे.
गणेशोत्सवात भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवे प्रसाद तयार करतात.
जाणून घ्या गणेशोत्सवात बाप्पाला आवडणारा प्रसाद कोणता ते.
मोदक: उकडीचे मोदक हा गणपती बाप्पाच्या सर्वात आवडीचा पदार्थ समजला जातो.
पूरणपोळी: पूरणपोळी हा पदार्थ देखील बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरणपोळी देखील बनवली जाते.
बुंदीचा लाडू: गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू देखील अर्पण केले जातात.
साटोरी (गोड पोळी): गणेशोत्सवात अनेक ठिकाणी साटोऱ्या बनविल्या जातात. म्हणजेच गोड पोळ्या. ज्या बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात.
श्रीखंड: गणेशोत्सवात बाप्पाला श्रीखंड देखील नैवद्य म्हणून दाखवलं जातं.
गोड शिरा: गणपती बाप्पाला नैवद्य म्हणून गोड शिरा देखील दाखवला जातो.
गोड भात: काही ठिकाणी बाप्पाला प्रसाद म्हणून गोड भात देखील बनवला जातो.
कोकोनट राइस: दक्षिण भारतात कोकोनट राइस देखील प्रसाद म्हणून बनवला जातो.
मेदूवडा: दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मेदूवड्याचा देखील नेवैद्य दाखविला जातो.
खीर: गणपती बाप्पाला खीर हा देखील आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे अनेक घरी खीर सुद्धा बनवली जाते.