'बलात्कार म्हणजे सरप्राईज सेक्स' सनी लिओनीच्या ट्विटवरून जेव्हा झाला होता वाद

मुंबई तक

अभिनेत्री सनी लिओनीचा आज ४१ वा वाढदिवस आहे, पॉर्न स्टार ते बॉलिवूड अॅक्ट्रेस हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे

सनी लिओनी-सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम अकाऊंट, सनी लिओनी

सनी लिओनी बॉलिवूडमध्ये आली ती जिस्म २ या सिनेमातून. या सिनेमाचं जे पोस्टर होतं त्याचीही बरीच चर्चा त्या काळी झाली होती. २०१२ मध्ये हा सिनेमा आला होता त्याआधी ती पॉर्न स्टार होतीरप्राक

बलात्कार म्हणजे सरप्राईज सेक्स असं ट्विट सनी लिओनीने केलं होतं त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. कमाल खानने ते रिट्विट केलं होतं. मात्र हे ट्विट आपण केलं नाही असा दावा सनीने केला होता आणि आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचंही तिने म्हटलं होतं.

सनी लिओनी आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करते आहे.. गुगलवर सर्वाधिक होणारी स्टार असाही तिचा लौकिक आहे

सनीच्या संपूर्ण आयुष्यावर Karenjit Kaur – the untold story of Sunny Leone ही डॉक्युमेंट्रीही प्रदर्शित झाली आहे

खूपच कमी लोकांना माहित आहे की सनी लिओनीचं खरं नाव करणजीत कौर असं आहे

सनी तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, त्या फोटोंवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस पडतो

सनीच्या गाण्यावरूनही कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे. त्यासाठी तिला मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. मात्र गेल्या १० वर्षांपासून विविध सिनेमांमध्ये काम करत सनीने आपलं स्वतःचं असं एक स्थान आणि प्रेक्षकवर्ग मिळवला आहे