धक्कादायक... 12 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई तक

मध्य प्रदेशातील भिंड येथे एका 12 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

(प्रातिनिधिक फोटो)
एवढ्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
(प्रातिनिधिक फोटो)

12 वर्षांचा मनीष जाटव हा चौथी इयत्तेत शिकत होता.

(प्रातिनिधिक फोटो)

शाळेतून घरी परतत असताना त्याला बसमध्ये अचानक चक्कर आली.

(प्रातिनिधिक फोटो)

यानंतर बस चालकाने मुलाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

(प्रातिनिधिक फोटो)

डॉक्टरांनी सांगितलं की, आम्ही त्याला CPR दिला, परंतु त्याला शुद्धीवर आणता आले नाही.

(प्रातिनिधिक फोटो)

डॉ. गोयल म्हणाले की, विद्यार्थ्याच्या पालकांनी शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

(प्रातिनिधिक फोटो)