मुंबई तक
कतारमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या FIFA विश्वचषक 2022 यंदा अर्जेंटिना संघाने पटकावला आहे.
अंतिम सामना अर्जेंटिना आणि गतविजेता फ्रान्स यांच्यात पार पडला.
अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर अत्यंत रोमहर्षक असा विजय मिळवला.
विश्वचषकात वितरित करण्यात येणारी बक्षीस रक्कम आधीच $440 दशलक्ष (सुमारे 3641 कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे.
विजेत्या अर्जेंटिना संघाला $42 दशलक्ष (रु. 347 कोटी) मिळणार आहे, जे मागील विश्वचषक स्पर्धेपेक्षा 4 दशलक्ष अधिक आहे.
उपविजेत्या फ्रान्स संघाला 248 कोटी रुपये मिळणार आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रोएशिया संघाला 223 कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या मोरोक्को संघाला 206 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.
FIFA विश्वचषक 2022 च्या साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक संघाला प्रत्येकी $ 9 दशलक्ष मिळतील.
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या संघांसाठी $13 दशलक्ष आणि सुपर-8 संघांना $17 दशलक्ष मिळणार आहेत.