मुंबई तक
राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते.
मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण आणि जाहीर सभा असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता.
यानंतर मोदींनी गुंदवली स्थानकातून मोगरा स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी नेत्यांसह विविध स्तरातील लोकांशी संवाद साधला.
यावेळी विद्यार्थी, कामगार, महिला यांच्यासह इतर मुंबईकरांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
मेट्रोचे काम केलेल्या कामागारांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी, आव्हानं समजून घेतली.
तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी त्यांना योगा करण्याचाही सल्ला दिला.