मुंबई तक
फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात होणार आहे.
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाचा पराभव केला आहे.
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि इतर बॉलिवूड कलाकार हे मेस्सीचा सामना पाहण्यासाठी कतारला पोहोचले आहेत.
सानियासोबत तिची बहीण अनमही स्टेडियममध्ये दिसली.
लिओनेल मेस्सी आणि त्याची टीम अर्जेंटिनाला पाठिंबा देण्यासाठी सानिया ही कतारला गेली आहे.
सध्या सानिया पती शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएबशी लग्न केलं होतं.
सानिया आणि शोएब यांना इझान मिर्झा मलिक हा मुलगा आहे.