मुंबईच्या लोकलमध्ये कॅटवॉक करतानाचा तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शिवम भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. त्याचं ‘द गाय इन स्कर्ट’ हे इन्टाग्राम अकाऊंट आहे.
शिवम हा एक फॅशन ब़्लॉगर आहे. तसेच अनेक मेकअपचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
याधी त्याने लुंगीमध्ये लोकलमध्ये डान्स देखील केला होता. हा व्हिडिओ देखील त्याचा सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता.
शिवम मूळचा मेरठचा असून काही वर्षांपूर्वी तो मुंबईत आला. लहानपणीपासूनच त्याला फॅशनची आवड होती. तो लपून-छपून फोटो क्लिक करायचा.
शिवम सांगतो, त्याच्या वडिलांना या सगळ्या गोष्टी आवडत नव्हत्या. त्यामुळे आधी त्याने बीबीएला प्रवेश घेतला आणि त्यानंतर सीएला.
पण अभ्यासात त्याचं अजिबात लक्ष लागतं नव्हतं. त्याच्या डोक्यात कायमच फॅशन ही गोष्ट असायची. त्यामुळे त्याने अभ्यास सोडला.
सीए सोडल्यानंतर वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिलं. त्यावेळी त्याचं वय अवघं १९ होतं आणि खिशात ७० रुपये होते.
त्यानंतर शिवमने कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यातून त्याने एक फोन घेतला आणि फॅशन कंटेट क्रिएटर बनला.
शिवमचं म्हणणं आहे की, त्याला त्याचं काम आवडतं. शिवम LGBTQ समुदायातून येतो. तो म्हणतो समाजाने मला कधीच स्वीकारलेलं नाही.