'इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे'; मुलाला धमकी येताच तात्या संतापले

वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला “सावध राहा रुपेश” अशा आशयाची एक चिठ्ठी मिळाली आहे.
'इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे'; मुलाला धमकी येताच तात्या संतापले
Vasant MoreFacebook/ Vasant More

पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक आणि पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाले आहे. याची माहिती वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. इतकंच नाहीतर वसंत मोरेंनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला इशाराही दिला आहे. वसंत मोरेंनी पुण्याच्या भारती विद्यापिठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला “सावध राहा रुपेश” अशा आशयाची एक चिठ्ठी मिळाली आहे. त्याच्या गाडीच्या समोरच्या भागात ही चिठ्ठी लावण्यात आली होती. मशिदीवरील भोंग्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या नाराजी व्यक्त केली होती, तेव्हापासून वसंत मोरे चर्चेत आहेत. आणि आता त्यांच्या मुलाला आलेल्या धमकीने ते आणखी चर्चेत आले आहेत. दरम्यान भारती विद्यापिठ पोलिसांनी अज्ञात इसमाच्या नावाने एफआयआर नोंदवाला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.

वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...

आमचेही अगदी तसंच आहे,

पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही...

राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...

गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,

पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे...

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,

त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये

"सावध रहा रुपेश"

आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली...

तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ?

हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय...

आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?

हे का तेच कळत नाही...

भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...

तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय...

बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप

वसंत ( तात्या ) मोरे आहे...!

अशा आशयाची पोस्ट वसंत मोरे यांनी केलेली आहे.

पुणे मनसेतून साईड लाईन झाल्यानंतरही वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य नोकरी मेळावा घेतला होता. आपल्या कामाच्या खास शैलीसाठी वसंत मोरे ओळखले जातात. धमकी देणारा सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचेही वसंत मोरेंनी सांगितले आहे, त्यामुळे पोलीसांना तपास आणखी सोपे जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in