शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला

सप्तशृंगी ट्रस्टकडून शिल्पा-राज कुंद्राचा विशेष सत्कार
शिल्पा शेट्टी - राज कुंद्रा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला
Published on

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने आज दुपारी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं.

हिमाचल प्रदेश येथील देवीच्या शक्तीपिठाचं दर्शन घेतल्यानंतर शिल्पा आपला पती राज कुंद्रा आणि भावासह देवीच्या दर्शनाला नाशिकमधील वणी येथे दाखल झाली होती. राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर शिल्पा-राज पहिल्यांदा समोर आले आहेत.

शिल्पा शेट्टी देवीच्या दर्शनासाठी आल्याची बातमी पसरल्यानंतर तिला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शत्रुनाशिनी माँ बगलामुखी मंदिर बनखंडी येथे त्यांची एकत्र पूजा केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत चामुंडा देवी मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

यावेळी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in