फेमिना मिस इंडिया 2020 चा ग्रँड फिनाले बुधवारी रात्री मुंबईत पार पडला यामध्ये मानसाने हा किताब पटकवला
मूळची हैदराबादची असलेली मानसा ही आर्थिक माहिती विषयक विश्लेषक आहे. अर्थ विषयक माहिती जाणून घ्यायला तिला आवडतं
मिस इंडिया हा किताब जिंकण्यापूर्वी मानसाने मिस तेलंगणा हा किताबही जिंकला आहे
मानसा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे
मानसा वाराणसीने मिस इंडिया हा किताब जिंकला आहे त्यामुळे ती आता 2021 च्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे
अभिनेत्री आणि 2000 मध्ये मिस वर्ल्ड चा किताब जिंकणारी प्रियंका चोप्रा हीला मी माझा आदर्श मानते असं मानसा म्हणते.
मिस इंडिया हा किताब मिळवणारी ती तेलंगण राज्यातील पहिली मुलगी आहे
बुधवारी झालेल्या स्पर्धेत हरयाणाची माणिका शोकंद मिस ग्रँड इंडिया 2020 ठरली तर उत्तर प्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया रनर अप ठरली आहे