अयोध्येत उभे राहणार 'महाराष्ट्र भवन', योगींनी दिली मंजुरी

मुंबई तक

अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काल CM शिंदे आणि DCM फडणवीसांनी यूपीचे CM योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल कोश्यारीही हजर होते.

मुख्यमंत्री योगी हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली.

या मागणीला योगी यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे अयोध्येतील महाराष्ट्र भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले.

याबाबत योगी यांनी समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनेही मुख्यमंत्री शिंदेंना आमंत्रित केलं आहे.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.