tunisha sharma : तुनिषाच्या मृत्यू प्रकरणात 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी आत्महत्या केली.

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्यात. त्यात एक बाब म्हणजे लव्ह जिहादची.

तुनिषा शर्मा तिचा सह कलाकार शीजान मोहम्मद खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

शीजान खानने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषा नैराश्यात होती आणि तिने आत्महत्या केली, असं तिच्या कुटुबियांनी सांगितलं.

आता याप्रकरणाला लव्ह जिहादशी जोडलं जात आहे. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा केलाय.

'हे प्रकरण लव्ह जिहादचं आहे आणि पोलीस याचा तपास करत आहे. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालेल्या आहेत,' असं गिरीश महाजन म्हणाले.

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी मात्र लव्ह जिहाद कनेक्शन फेटाळून लावलं आहे. ब्रेकअपमुळे तिने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय.