साडेतीन शक्तीपीठांच रुप अन् नारी शक्तीचा गौरव : प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

मुंबई तक

कर्तव्यपथ अर्थात राजपथावर (Rajpath) भारताच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी परेड पाहण्यासाठी भारतीयांची खास उपस्थिती असते.

यंदा या संचलनात महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठाचा चित्ररथ सहभाग घेणार आहे.

साडेतीन शक्तीपीठासोबतच स्त्रीशक्तीचा जागर देखील दाखवला जाणार आहे.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत.

यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.