देशभरात आजपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबईत महापालिका राज्य शासनाच्या रुग्णालयांसोबतच खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
मुंबईत BKC, मुलुंड, नेस्को गोरेगाव, सेव्हल हिल्स रुग्णालय आणि दहिसर जंबो केंद्र इथे महापालिकेतर्फे मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार असल्यामुळे दहिसर येथील केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली.
परंतू पहिल्याच दिवशी दहिसर केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लसीकरणाच्या कामाला उशीरा सुरुवात झाली.
तोपर्यंत लसीकरणासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक केंद्रावर रांगा लावून बसले होते.
ज्येष्ठ नागरिकांसोबतच तब्येत खराब असलेल्या ४५ ते ५९ या वयोगटातील लोकांनाही या टप्प्यात लस दिली जाणार आहे. परंतू यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे या व्यक्तींकडे आजारी असल्याचं प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे.