अदृश्य हा मराठीत तयार होणारा एक थ्रिलर सिनेमा आहे. ज्यात अभिनेत्री मंजिरी फडणीस दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी इमेज असणारा अभिनेता पुष्कर जोग या सिनेमात मंजिरी फडणीसच्या पतीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
बॉलिवूड आणि टॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल निर्मित लवली वर्ल्ड प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘अदृश्य’ चित्रपट केला जाणार आहे.
अदृश्य’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आलं आहे.
या चित्रपटात मंजिरी फडणीस, सौरभ गोखले आणि पुष्कर जोग तसेच अभिनेत्री उषा नाडकर्णी, अजय कुमार सिंह, अनंत जोग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जून मध्ये प्रदर्शित होणार आहे.