‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे.
अमिताभ बच्चन यांना झालेल्या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.
बच्चन यांनी ब्लॉगवर माहिती देताना म्हटलंय की, त्यांना शरीरात तीव्र वेदना होत असून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.
‘परिस्थिती योग्य होईपर्यंत सर्व काम थांबवलं आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.’
अमिताभ यांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्यांना बराच वेळ लागणार आहे.
प्रकृती ठीक होईपर्यंत अमिताभ हे आपल्या चाहत्यांना भेटू शकणार नाहीत. याबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
सोमवारी संध्याकाळी त्यांच्या जलसा या बंगल्याच्या दारात येणाऱ्या चाहत्यांनी कृपया येऊ नका अशी त्यांनी विनंती केली आहे.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या ठीक आहे. मात्र, ते अद्यापही तंदुरुस्त नाहीत. त्यामुळेच त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.ए