‘दृश्यम 2’चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयसोबत 9 फेब्रुवारी रोजी लग्न केलं.
लग्नानंतर अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. याशिवाय शिवालिका तिच्या सिझलिंग लूकमुळेही चर्चेत आहे.
खरं तर, शिवालिका ओबेरॉयने इंस्टाग्रामवर बिकिनी फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.
फोटोंमध्ये शिवालिका काळ्या रंगाची बिकिनी घालून समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे.
फोटो शेअर करताना शिवालिकाने कॅप्शनमध्ये लिहलंय की, ‘टोस्टेड…’ शिवालिकाचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील त्यावर कमेंट करणं सुरू केलं आहे.
अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, फायर.. तर दुसऱ्या चाहत्याने, sunkissed. असं लिहलंय. त्याचबरोबर अनेक जण अभिनेत्रीला सुपरहॉट म्हणत आहेत.
त्याच वेळी, अभिनेत्री शिवालिकाच्या या अदा पाहून तिचे चाहतेही फिदा झाला आहेत.
शिवालिकेची ही स्टाइल पाहून यूजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
मात्र, शिवालिका आणि अभिषेक पाठक हनिमूनला नेमके कुठे गेले आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही.
अशाच वेब स्टोरीजसाठी क्लिक करा