सुपरस्टार गोविंदाने आपला मुलगा यशवर्धन आहुजाचा वाढदिवस 3 मार्च रोजी कुटुंबासमवेत साजरा केला.
वाढदिवस सेलिब्रेशन इव्हेंटच्या बाहेर मीडियाचे अनेक कॅमेरे देखील होते. गोविंदा आपली पत्नी सुनीता, मुलगा यशवर्धन आणि टीना यांच्यासमवेत या पार्टीला आलेला.
प्रत्येकाने मीडियाला फोटोसाठी खास पोझही दिल्या, बर्थ डे बॉय यशवर्धन देखील यावेळी देखणा दिसत होता. पण गोविंदाची मुलगी टीना ही आता ट्रोल होत आहे.
पार्टीत, टीना शॉर्ट ड्रेस आणि उंच हिल्समध्ये आली होती. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती.
मीडियाला फोटो देताना टीना तिच्या शॉर्ट ड्रेसबाबत मात्र खूपच अस्वस्थ दिसत होती. ती पुन्हा-पुन्हा तिचा ड्रेस खाली खेचत होती.
यूजर्सने टीनाचा ड्रेस हा नाईट सूट असल्याचं म्हटलं आहे.
यूजरने म्हटलं की, जेव्हा आपण छोटे कपडे घालताना कम्फर्टेबल नसता तर तुम्ही ते का घालता?
दुसऱ्या यूजरने म्हटलं- टीना या कपड्यांमध्ये अस्वस्थ आहे. हे कपडे त्यांच्यासाठीह घट्ट आहेत.
आणखी एका यूजरने असंही म्हटलं की, हे संपूर्ण कुटुंब एकत्र का फिरत असतं? प्रत्येकाला प्रसिद्धीची आवड आहे.
तथापि, बर्याच लोकांनी गोविंदाच्या कुटुंबाचे सुंदर असं वर्णन देखील केलं आहे.