युपीएससीची (UPSC) तयारी करणाऱ्या एस्पिरेंट्सचे LBSNAA अॅकेडमीत पोहोचण्याचे स्वप्न असत. ही ती अॅकेडमी आहे जिथे IAS ऑफिसरची ट्रेनिंग होते.
या अॅकेडमीचे संपूर्ण नाव ”लाल बहादूर शास्त्री नेशनल अॅकेडमी ऑफ अॅड्मिनिस्ट्रेशन” आहे. ही अॅकेडमी उत्तराखंडच्या मसूरीत आहे.
अॅकेडमीत दिवसाची सुरूवात सकाळी 6 वाजता होते. 1 तासाच्या फिजिकल ट्रेनिंगनंतर इतर कामे सूरू होतात.
सकाळच्या 9 वाजल्यापासून अॅकेडमीचे सेशन सुरू होतात.प्रत्येक सेशन 55 मिनिटांचा असतो, आणि 5 ते 6 सेशनमध्ये ट्रेनिंग चालते. संध्याकाळच्या वेळेस एस्पिरेंट्स खेळतात किंवा घोडेस्वारी करतात.
ट्रेनिंगच्या पहिल्या टप्प्यात एस्पिरेंटसना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासह इतर मंडळीना भेटायचे असते.
एस्पिरेंटसना एका वर्षाचे जिल्हा प्रशिक्षणही असते, ज्यामध्ये त्यांना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचे असते. याआधी त्यांना 2 मॉड्यूल ट्रेनिंग दिल्या जातात.
एक विंटर अॅकेडमीक टूर देखील असते. यासह संसदीय अभ्यास ब्युरोमध्ये एक आठवड्याचे प्रशिक्षण आहे. या दरम्यान संसदेच्या कामाची माहिती मिळते.
दुसरा टप्पा ट्रेनिंग थीम बेस्ड असतो. यामध्ये नीति निर्माण, राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था, शहर व्यवस्थापन आणि इतर विषयाची ट्रेनिंग होते.