गोव्यात फेणी बनवण्याची पद्धत आजही पारंपारिक म्हणजे तब्बल ५०० वर्षे जुनी आहे.
फेणी तयार करण्यासाठी, पिकलेली काजू फळं काढली जातात आणि पायाने कुस्करली जातात.
कुस्करुन मिळालेला रस मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात साठवला जातो. मग ही भांडी ठराविक काळासाठी जमिनीत गाडली जातात.
ठराविक वेळेनंतर हा रस लाकडाच्या आगीवर उकळला जातो. वाफेच्या प्रक्रियेनंतर हा रस गाळला जातो.
फेणीवर डिस्टिलेशनची प्रक्रिया तीनवेळा केली जाते. यातील पहिल्या प्रक्रियेतून मिळवलेल्या रसला ‘उरक’ म्हणतात, यात सर्वात कमी नशा असते.
उरक नंतर काजुलो बनवण्यासाठी त्या रसाला पुन्हा डिस्टिल्ड केले जाते. काजुलोची मागणी स्थानिक बाजारपेठेत फारशी नाही.
शेवटच्या प्रक्रियेत जी तयार होते ती फेणी असते. अत्यंत स्ट्रॉंग आणि एका पेगमध्ये ‘डोक्याला शॉट’ बसवणाऱ्या ‘फेणी’साठी लोकं अक्षरशः वेडी असतात.