कुस्तीपटू ‘खाशाबा दादासाहेब जाधव’ (K.D Jadhav) यांची कामगिरी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत नसून संपूर्ण भारतासाठी आहे.
भारतीय दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची 15 जानेवारी 2023 रोजी 97वी जयंती आहे.
कुस्तीची आवड असणाऱ्या खाशाबांनी वयाच्या 10व्या वर्षापासून वडिलांसोबत कुस्तीची तयारी सुरू केली होती.
1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जर्मनी, मॅक्सिको आणि कॅनडाच्या खेळाडूंना पराभूत करून कांस्य पदक पटकावलं होतं.
खाशबा जाधव दिसायला अगदी हे काटक आणि फक्त 5 फूट 5 इंट उंचीचे होते.
पण खाशाबा जाधवांना विश्वास होता की, ते हा खेळ नेहमी तंत्रकौशल्याने जिंकू शकतात.
खाशाबांच्या हेड लॉकिंग शैलीची नेहमी प्रशंसा केली जायची.
पहिल्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबांनी सर्वश्रेष्ठ आणि अनुभवी असणाऱ्या कुस्तीपटूशी सामना खेळला होता.
पहिल्या ऑलिम्पिक सामन्यात ते सहाव्या स्थानावर होते.
यानंतर खाशाबांना गुडघ्याच्या दुखापतीमुळे कुस्ती सोडावी लागली होती, यामुळे त्यांचे सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
खाशाबा जाधव यांचा मृत्यू 14 ऑगस्ट 1984 मध्ये झाला. आज 97 व्या जयंतीनिमित्त गुगलने त्यांना डुडल मानवंदना दिली आहे.